करमाळा शहरातील महाराणा प्रताप यांचा जयंती उत्सव कौतुकास्पद – युवानेते शंभूराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी    

करमाळा शहरात आयोजित केलेला यावर्षीचा महाराणा प्रताप जयंती उत्सव अप्रतिम, सर्व समावेशक अन् समाजाला दिशादर्शक होता. या दिवशी शहरातील रजपूत समाजासह सर्व समाजातील लहान – थोर मंडळी मग त्यामध्ये महिलांसह बुजूर्ग मंडळींनी मिरवणूकी मध्ये उत्साहाने सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला. हलगी, ढोल-ताशा, बँजो सह पारंपारिक

वाद्ये अन् आधूनिक संगित वाद्यांनी शहराचा परिसर अगदी दुमदुमून गेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी-आनंद दिसत होता. मला स्वतःला तब्बल अडीच तास या मिरवणूकीत सहभागी होता आले याचे मी भाग्य समजतो असे प्रतिपादन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी केले. पूढे बोलताना ते म्हणाले की, महाराणा प्रताप यांच्या मंगळवार पेठेतील पुतळ्या मूळे शहराच्या सौंदर्यात एक विशेष भर पडलेली आहे. पुतळ्या कडे पाहीले तरी त्यांच्या पराक्रमाचा इतिहास आपल्या समोर राहतो शहरवासियांनी आयोजित केलेली मिरवणूक अतिशय उत्कृष्ट, दिशादर्शक, संदेश देणारी व स्मरणात ठेवण्या सारखी होती असेही ते म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *