दत्त मंदिर ते कोर्ट रस्त्याच्या कडेला गटारीची व्यवस्था करा :- संजय घोलप
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्यातील जि.प. बांधकाम हद्दीतील बरेच दिवसांचा प्रलंबित प्रश्न दत्त मंदिर ते कोर्ट रस्ता डांबरीकरण कामाचा पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल मा. उपअभियंता गोढरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने सत्कार
करून अभिनंदन केले. तसेच गोंढरे यांना एक विनंती केली कि रस्त्याच्या कडेला गटारीची व्यवस्था करा तरचं हा रस्ता टिकेल. त्यावर गोंढरे यांनी लवकर त्याचे पण काम चालु करू, असे सागितले. यावेळेस उपस्थित संजय घोलप मनसे
तालुकाध्यक्ष करमाळा, दिपक थोरबोले उपसरपंच देवीचामाळ, शहाजी झिंजाडे.