मकाई कारखान्याची निवडणूक जाहीर,शेतकऱ्यांचे पेमेंटचे काय…?
करमाळा प्रतिनिधी
मकाई कारखान्याची निवडणूक जाहीर जागा व निवडणूक तारखांची घोषणा झाली परंतु शेतकऱ्यांचे पेमेंट न मिळाल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून यांचे नामनिर्देशक पत्र भरण्याचे काम सुरू होणार आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून निवडणूक बाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. मागील वेळी झालेल्या निवडणुकीत दिग्विजय बागल गटांनी एकतर्फी विजय संपादित करीत सत्ता मिळवली होती. यंदा दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ हे स्वतंत्र पॅनल उभा करणार असल्याची माहिती असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होईल अशी शक्यता आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक आल्यानंतर मकाई कारखान्याच्या निवडणुकीबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. परंतु आता निवडणूक जाहीर झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांनी जाहीर केले आहे. पाच गटातून 11 तर इतर पाच गटातून सहा जागांची ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक गट भिलारवाडी दोन जागा, पारेवाडी गट तीन जागा, चिखलठाण गट दोन जागा, वांगी गट दोन जागा, मांगी दोन जागा तर राखीव मतदारसंघांमध्ये बिगर उत्पादक सहकारी व पणन संस्था यामध्ये एक जागा, महिला राखीव मध्ये दोन जागा, अनुसूचित जातीमध्ये एक जागा, मागासवर्गीय मध्ये एक जागा, भटक्या विमुक्त जातीमध्ये एक जागा असे एकूण 17 जागावर निवडणूक होणार आहे.
नामनिर्देशक पत्र भरण्याची तारीख 12 मे ते 18 मे दरम्यान अकरा ते तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे आहे. तर मतदान 16 जून 2023 रोजी होणार आहे. मतमोजणी 18 जून तारखेला होईल तर लगेचच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येणार आहे.प्रा रामदास झोळ यांना विविध नेते मंडळी यांनी पाठींबा दिला आहे तसेच मकाईने शेतकरी देणी,कारखाना अडचणीतून बाहेर काढणे आदी मुद्दे आहेत या बाबत पुढील यु रचना कसे करणार ते पाहावे लागेल कारण बागल यांचा तो बालेकिल्ला असल्याचे बोलले जात आहे तर मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन दिग्विजय बागल यांची सत्ता गेले कित्येक वर्षापासून आहे यावेळी मात्र शेतकरी पेमेंट व इतर देणी असल्यामुळे ते मतदारां समोर कशा प्रकारे जातील ते पाहण्याची गरज आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *