करमाळा तालुक्यातील मच्छिमार बांधवांसाठी श्रीमती इंगवले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, लवकरच साहित्य मिळणार….
करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मच्छिमार बांधवांना शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीमती पद्मजा इंगवले यांच्या पाठपुराव्यामुळे, होडी तसेच इतर साहित्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या मच्छिमार बांधवांना सदरचे साहित्य मिळावे. यासाठी श्रीमती पद्मजा इंगवले यांनी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे, यांना भेटून तालुक्यातील विधवा, गरिब व गरजवंत मच्छिमार महिलांना विविध साहित्य मिळावे. यासाठी निवेदन दिले होते. सदरच्या निवेदनाची दखल घेऊन नितेश राणे यांनी प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, पुणे विभाग व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, सोलापूर येथील कार्यालयांना तातडीने उजनी जलाशयाच्या कडेला राहणाऱ्या गावातील मच्छिमार बांधवांचे अर्ज व कागदपत्रे स्वीकारणे. तसेच येथील सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे भीमाशंकर पाटील (सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सोलापूर), राजेश पाटील (मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सोलापूर), विनोद वाघमोडे (वरीष्ठ लिपिक सोलापूर) यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती पद्मजा इंगवले यांनी उपस्थित राहुन केत्तुर-1, केत्तुर-2, पारेवाडी, दहिगाव, चिखलठाण या गावातील गरजू लाभार्थ्यांची कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वीकारली.
यावेळी श्रीमती इंगवले यांनी बोलताना सांगितले कि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी सदैव तत्पर आहे. याचा विचार करुनच तालुक्यातील मच्छिमार बहिणींच्या हिताचा विचार करुन, त्यांना सदरचे साहित्य लवकरात-लवकर मिळणार आहे. तरी तालुक्यामधील विविध गावातील अशा विधवा, गरिब व गरजू अनेक लाभार्थी मच्छिमार महिला त्यांची कागदपत्रे आमच्याकडे लवकरच जमा करणार आहेत. त्यांना देखिल याचा लाभ मिळावा. यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. अशा प्रकारे श्रीमती इंगवले यांनी सांगितले.
यावेळी मत्स्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचा जेऊर येथे संयम ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर तालुक्यातील विविध गावांमध्ये मच्छिमार बांधवांनी मोठ्या आनंदात श्रीमती पद्मजा इंगवले व अधिकाऱ्यांचा सन्मान केला.

चौकट….
आजपर्यंत करमाळा तालुक्यात आमच्यासाठी कोणी काहीच केले नाही. आमचा फक्त प्रत्येकजण मतासाठी वापर करतो. परंतू मच्छिमारांच्या देखील काही अडचणी असतात. आणि त्या सोडविण्यासाठी तालुक्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतू तसे होताना दिसून येत नाही. परंतू सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षा पद्मजाताई इंगवले या विधवा महिलांना मान-सन्मान मिळावा. महिला सक्षमीकरण व तालुक्यातील विविध मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे श्रीमती इंगवले ह्या मच्छिमारांसाठी करत असलेले काम आमच्यासाठी सदैव आठवणीत राहील.

बेबीताई कणिचे, केत्तुर-2

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *