जेआरडी माझा
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कृषी निर्यात, व्यापार, वाहतूक संबंधित पाठपुराव्याची घेतली दखल

करमाळा (प्रतिनिधी) : इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज येथील वाहतूक संकटामुळे निर्यातदार, शेतकरी व व्यापार क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली होती.त्यास प्रतिसाद देत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. पीयूष गोयल साहेब यांनी पत्राद्वारे माहिती दिली असून केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत विविध मंत्रालयांच्या समन्वयातून तातडीच्या उपाययोजना सुरू केल्याचे नमूद केले आहे.
यामध्ये
१)निर्यात व ट्रान्सशिपमेंट सुलभता
२)प्रभावित खेपांसाठी शुल्क सवलती
३)पर्यायी मार्गांची उपलब्धता
४)RoDTEP दरवाढ
५)ECGC मार्फत मदत
६)खराब होणाऱ्या कृषी मालासाठी विशेष उपाययोजना
७)ग्रीन कॉरिडॉर व समर्पित शिपिंग व्यवस्था
यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
शेतकरी, निर्यातदार आणि व्यापार क्षेत्राच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार मा.धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रयत्न निश्चितच दिलासादायक ठरत आहेत.
