
महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली whatsapp निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सपन्न
करमाळा- साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ नगर येथे मातंग एकता आंदोलन करमाळा शहर व स्व.नामदेव जगताप युवा मंच या संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली whatsapp निबंध स्पर्धा चे आयोजन केले होते. ही स्पर्धा घरीच बसून महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एका विषया वर लिहून

Whatsapp करायची होती यात अहमदनगर,जळगाव,टेंभुर्णी, सोलापूर, पुणे, करमाळा येथील एकूण 35 विद्यार्थी यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन अतिशय सुरेख लेखन करण्यात आले. १६ एप्रिल रोजी निकाल पत्र सादर केल असता. प्रथम क्रमांक प्रणव शरद भैलुमे राहणार अहमदनगर तर द्वितीय क्रमांक दिग्विजय चिवटे राहणार करमाळा व तृतीय किरण मार्तंड जगताप पुणे असा निकाल लागल्यानंतर यांचा सन्मान करून बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे,दलित सेनेचे लक्ष्मण भोसले,

आरपीआय यु.जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे ,मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, बीजेपी चे सुहासजी ओहोळ,नाना कांबळे, तर सूत्रसंचालन भिमराव कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमात प्रमाणपत्र संयोजन मातंग आंदोलन ता.अध्यक्ष शरद पवार यांच्या कडून तर आयोजन मातंग एकता आंदोलन चे शहराध्यक्ष युवराज जगताप यांनी केले तर यावेळी अभिजीत मंडलिक, सोनू आलाट,अक्षय आलाट, कपिल मंडलिक बीजेपी उपाध्यक्ष,विश्वराज चिकू आलाट,अतिष जगताप, बबलू भिसे,सोनू करंडे, सागर आलाट, सोनू मंडलिक, विशाल आलाट या युवकांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
