महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतुन वांगी गावचे सुपुत्र श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड.

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या 626 उमेदवारांच्या मधून काल झालेल्या मुलाखती मधून 203 जणांची अंतिम निवड झाली आहे. त्यामध्ये वांगी नं.1 ता. करमाळा येथील सुपुत्र श्रीराज नानासाहेब देशमुख यांची

56 व्या रँक नुसार निवड झाली आहे. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व  कृषिसेवा गट-ब संवर्गातील  पदांसाठी निवड केली जाणार आहे. वांगी गाव चे श्रीराज देशमुख यांचे शालेय शिक्षण  अकलूज येथे तर महाविद्यालयिन शिक्षण कोल्हापूर येथील अॅग्री कॉलेज मध्ये पार पडले आहेत तर Msc ऍग्री चे शिक्षण राहुरी कृषी

विद्यापीठ मधून पार पडले आहे. श्रीराज देशमुख यांच्या यशाचे वांगी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे व पेढे वाटून  अभिनंदन  केले आहे. शहाजीराव देशमुख, ग्रा.सदस्य दत्ताबापू देशमुख, पांडुरंग देशमूख, सोसायटी सदस्य नितीन देशमुख, दत्तात्रय गायकवाड, डॉ. यमगर, केशव भूतकर, मधुकर पाटिल, वैभव पाटील, तात्यासाहेब देशमुख, खंडेराव पाटील, आबा देशमुख, रावसाहेब देशमुख, अॅड. दीपक देशमुख, विजय पाटील, संजय पाटील, इ. उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *