
आगामी काळात भाजपाला जनताच त्यांची जागा दाखवेल – अध्यक्ष प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी
भाजपा सरकारने राजकीय राग मनात धरुन राहुल गांधीवर कारवाई केली आहे. आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी माहिती पत्रकार परिषदेत करमाळा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी सांगितले आहे. यावेळी सुजय यशवंत जगताप युवक शहराध्यक्ष, गफुरभाई शेख तालुकाध्यक्ष ओ.बी.सी.विभाग, आनंद झोळ तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की,
राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत आदानी घोटाळयासंदर्भात प्रश्न विचारले.

अदानी उद्योग समूहात गुंतवलेल्या शेअर कंपन्यातील 20 हजार कोटी रुपये कोणाचे?
यामध्ये चिनी नागरिकाचाही सहभाग आहे, हा चिनी नागरिक कोण?
उद्योगपती गौतम अदानी पण नरेंद्र मोदी यांचा संबंध काय?
विमानतळ, संरक्षण क्षेत्र, उर्जाक्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदिंनी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला, याचे राहुल गांधी यांनी कागदपत्रासह पुरावे दिले.
राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला परंतु या दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला.

अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती गठित (JPC) करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. परंतु मोदी सरकार संसदेचे कामकाजात चालू देत नाही.
सत्ताधारी पक्षच संसदेचे कामकाज चालू देत नाही. काँग्रेस पक्षाचे जेपीसीची मागणी करताच संसदेचे कामकाज स्थगित केले जाते.
अदानीला वाचवण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे.
मोदी सरकारमधील मंत्रांनी राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले, त्यावर राहुल गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगीच दिली जात नाही.
राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर 9 दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 24 तासातच त्यांची खासदारकी रद्द केली व आता सरकारी घर खाली करण्याची नक्कीच पाठवली.
मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत आहे.
अदानी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून भाजपा जाणीवपूर्वक राहुल गांधीवर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे.

परदेशात राहूल गांधी यांनी देश विरोधी वत्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे पण त्यात काहीही तथ्य नाही.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपाकडून धादांत खोटा आरोप केला जात आहे.
निरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत.
भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाऱ्यांशी जोडून ओबीसी समाजाचाच अपमान करत आहे.
काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाचा योग्य सन्मान राखला जातो, सध्या काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत.
राहुल गांधी देश जोडण्याचा संकल्प घेऊन 4 हजार किलोमीटरची पद यात्रा करतात ते एक जात समुदायाचा अपमान कशाला करतील?
मोदी सरकार चोर, दरोडेखोर घोटाळेबाजांचा पर्दाफाश करनाऱ्या राहुल गांधी यांना लक्ष करून त्यांच्यावर कारवाई करत आहे. पण काँग्रेस पक्ष अत्याचारी, जुलमी ग्रज सत्तेला घाबरली नाही, मोदी सरकारला कशासाठी घाबरेल?
लोकशाही, संविधान व देश वाचवण्याची ही लढाई आहे, काँग्रेस ही लढाई जनतेच्या दरबारातही लढेल व विजय होईल.असेही अखेर जगताप यांनी सांगितले आहे