करमाळ्यामध्ये शिवरायांचा विचार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला .
करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती . मिरवणूक जामा मज्जिदी समोरून जात असताना करमाळा तालुक्यातील आमचे मुस्लिम बांधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. हे एक तेचे दर्शन करमाळ्यामध्ये दिसून आले यामध्ये करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय जोतीराम गुंजवटे साहेब सुद्धा सहभागी होते .

           छत्रपती शिवराय हे एकात्मतेचे प्रतीक होते हे या आजच्या मिरवणुकीतील कृतीने दिसून आले ही मानवता छत्रपती शिवाजी महाराजांनीच शिकवली याच मानवतेवर आज करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव चालतोय याचा मला अभिमान वाटतो. 

आमचे मुस्लिम बांधव म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया कोणत्या धर्माविरुद्ध नव्हत्या कोणत्या जातीविरुद्ध नव्हत्या व कोणत्या वर्णभेदा विरुद्ध नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया या जुलमी अन्यायानविरुद्ध होत्या .त्या राजकीय लढाया होत्या त्यामुळे छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माते ठरले या स्वराज्याचा अनमोल धागा म्हणजे सर्वधर्मसमभाव यात कोणताच भेद नाही हेच छत्रपतींच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य आहे आणि आम्ही त्याच स्वराज्याचे मावळे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे .

रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे विचाराचे नाते कधी पण श्रेष्ठच असते करमाळ्यामध्ये हम सब एक है हिंदू-मुस्लीम भाई – भाई है

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *