करमाळा प्रतिनिधी पुणे-मुंबई मिसिंग लिंक महामार्गाला हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे पहिले हुतात्मा शिंग्रोबा धनगर हे होते. गोरे इंग्रज मुंबई पुणे रस्त्यासाठी एक वर्षभर प्रयत्न करत होते रस्ता शोधण्यासाठी परंतु ते इंग्रज हतबल परंतु रस्ता काही सापडेना. शिंग्रोबा धनगर त्या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीमध्ये मेंढर राखण्याचे काम करत होते. इंग्रज हे त्यांच्याकडे गेले आणि विचारले आम्हाला मुंबई पुणे रस्ता करावयाचा आहे परंतु आम्हाला सापडत नाही. हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांनी इंग्रजांना आपल्याबरोबर घेऊन सह्याद्री पर्वतातून रस्ता दाखवण्याचे काम केले. इंग्रज अधिकारी खुश झाले. त्यांनी हुतात्मा शिंग्रोबा धनगरांना विचारले या रस्त्याच्या मोबदल्या तुला काय पाहिजे ते माग परंतु शिंग्रोबा धनगर अशिक्षित असताना सुद्धा त्यांनी आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याची मागणी केली. त्या इंग्रज अधिकाऱ्याला राग आला आणि हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांना त्यांनी गोळ्या घालून ठार केले अशा या देशप्रेमी हुतात्म्याचे मिसिंग लिंक महामार्गाला हुतात्मा शिंग्रोबा धनगर असे नाव घेण्यात यावे अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र मधून होत आहे. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेऊन हुतात्मा शिंग्रोबा यांच्या देश प्रेमाचा सन्मान करावा अशी मागणी सुपनवर यांनी केली आहे. यावेळी भाजप सोलापूर जिल्हा चिटणीस विनोद महानवर, प्रवीण होगले, गंगाराम वाघमोडे सर, तात्यासाहेब काळे, संदीप मारकड, बापूसाहेब घरबुडे, जीवन होगले, धनंजय कोळेकर, विशाल हाके, विश्वजीत नरुटे, अण्णासाहेब गोपने, बाळासाहेब भिसे सर, आजिनाथ इरकर, कैलास पवार, सुशील नरुटे, किशोर शिंदे, दादा महानवर, लालासाहेब हुलगे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *