
कै.सा.ना.जगताप मुली नं.१ या शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
*करमाळा नगर परिषदेच्या कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ या शाळेत रयतेचे राजे विश्ववंद्य छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या वतीने छ्त्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाळेपासून छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी झालेले वेशभूषेतील जिजाऊ,शिवराय,भगवा ध्वज

घेतलेले मावळे,मुलींचा लेझिम पथक यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथी मुलींनी उत्कृष्ट लेझिम नृत्य करून सर्व नागरिकांची मने जिंकली त्याप्रसंगी तहसीलदार मा.समीर माने साहेब,पोलीस निरिक्षक मा. जोतीराम गुंजवटे साहेब,जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

श्री.अमृतसिंग परदेशी,उपाध्यक्षा सौ.भाग्यश्री फंड,व सर्व सदस्य यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून अभिनंदन केले.शिवजयंती उत्सव रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील लेझिम नृत्य बसविणारे श्री.रमेश नामदे सर,त्यांना सहकार्य करणारे श्री. भालचंद्र निमगिरे सर,श्री.निलेश धर्माधिकारी

सर,सौ.चंद्रकला टांगडे मॅडम,सौ.सुनिता क्षीरसागर मॅडम,सौ.मोनिका चौधरी मॅडम,श्रीम.तृप्ती बेडकुते मॅडम,श्रीम.भाग्यश्री पिसे मॅडम,श्रीम.संध्या शिंदे मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.रसिका मोरे,सौ.माधुरी देशमाने,सौ.आकांक्षा यादव,सौ.मोहिनी वीर,पूजा माने,माधुरी पटेल यांनी परिश्रम घेतले.शिवजन्म महोत्सव कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील सर्व जातीधर्मा तील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
