
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष मा. श्री. जयप्रकाश बिले सर व व्यासपीठावरील मान्यवारांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले सर, सचिव युवराज बिले सर, खजिनदार आशाताई बिले मॅडम, संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम हे मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये भाषण, देशभक्ती गिते, शूर विरांच्या महिमा सांगणारी नाटकं यांचा समावेश होतो. संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश बिले सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांचे व स्टाफचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नफिसा घोडके मॅडम व धनश्री साने मॅडम यांनी केले. मान्यवरांचे आभार प्रदर्शन संस्थेचे सहाशिक सतिश कोंडलकर सर यांनी केले.