करमाळ्यात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मान्यता

जेआरडी माझा

करमाळा येथील भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच ही मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी बालाजी लोंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पांडुरंग उबाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्याची मागणी करमाळ्यातील शिवस्मारक प्रतिष्ठानने दोन वर्षांपूर्वी केली होती. परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर पुतळा उभारण्यास मान्यता दिली.

 यावेळी नगरसेवक प्रवीण जाधव, अतुल फंड, सचिन घोलप, संजय घोलप, सुनील सावंत, अमोल यादव आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *