
श्री. खोलेश्वर महादेवाच्या नंदीची भव्य मिरवणूक
करमाळा प्रतिनिधी
श्री खोलेश्वर प्रसन्न खांद्यावरून सहवाद्य / सालाबाद प्रमाणे श्री. खोलेश्वर महादेवाच्या नंदीची भव्य मिरवणूक फाल्गुन शुक्ल तृतीया दि. २२ / २ / २०२३ रोजी सायंकाळी 5:55 वा. निघणार आहे.
सदर मिरवणुक ही महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुल सौंदर्य चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्तपेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, आंबेडकर पुतळा ते किल्लावेस महादेव मंदिर या मार्गे निघण्यात येणार आहे. तसेच सदर मानकरी, नंदीचे खांदेकरी व आरती मंडळाचे सर्व सदस्य व करमाळा शहरातील सर्व भाविक भक्त यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. तरी भाविक भक्तांनी या मिरवणुकीसाठी सढळ हाताने मदत करावी.असे आवाहन श्री खोलेश्वर आरती मंडळ करमाळा यांनी केले आहे


