शिवजयंती निमित्त घोटी येथे आरोग्य शिबिर

तीनशे रुग्णांची तपासणी औषधांची मोफत वाटप

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे उपक्रम

करमाळा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीनिमित्त घोटी येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात
तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली मोफत औषधाचे वाटप करण्यात आले

विराट डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर अभिजीत बगाडे डॉक्टर निलेश कुबेर डॉक्टर प्रियंका साळुंखे हेल्थ असिस्टंट तोडकरी दत्ता कावळे सुरेखा सावरे वर्षा पोद्दार डॉक्टर महेश तळेकर या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर के सहाय्यक रोहित वायबसे कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे बोटीचे सरपंच सचिन अण्णा राऊत विठ्ठल म्हेत्रे मेजर तात्या नवरे घोटीचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद काका पाठक सुधीर राऊत प्रवीण राऊत वैभव राऊत सुनील डिकोळे सुभाष थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते

धर्मवीर आनंद दिघे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वाडे वस्तीवरील वरील रुग्णांची तपासणी करण्यात आली

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक गावात हा धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखान्याची गाडी जाणार असून रुग्णांना घरपोच तपासणी व औषधी देण्यात येणार आहेत

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *