
शेटफळ येथे श्रीकृष्ण मंदीराचा भुमीपुजन कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या युगात गावोगावची मंदीरे ही सकारात्मक ऊर्जेची केंद्र व्हावीत असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे मुंबई वडाळा येथील प्रमुख डॉ. युवराज शास्त्री यांनी शेटफळ ता करमाळा येथे श्रीकृष्ण मंदीराच्या भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.पुढे बोलताना ते म्हणाले की आज समाजात लाखोंची संपत्ती असणारी मंडळी सुखी व समाधानी दिसत नाहीत. आजच्या विज्ञानाच्या युगात सर्वांच्या मनात नकारात्मक भावना दिसते अशावेळी सकारात्मक विचार रूजवण्यासाठी

अध्यात्माची गरज आहे यामुळे गावोगावी असणारी मंदीरे ही सकारात्मक ऊर्जेचे केंद्र झाली पाहिजेत. यावेळी महानुभाव पंथाच्या भोसे येथील केंद्राचे महंत दत्तराज शेवलीकर यांनी जगातील विविध धर्म व उपासना पद्धती वेगवेगळी असली तरी सर्वांचे सार एकच असल्याचे स्पष्ट केले.यावेळी शेटफळ येथील पोळ परिवारातील तुकाराम पोळ, चंद्रकांत पोळ,हरीदास पोळ, आप्पासाहेब पोळ,वसंत पोळ, लालासाहेब पोळ,गोकूळ पोळ साहेबराव पोळ,आदिनाथ पोळ, बिभिषण पोळ, सुनील पोळ, सतिष

पोळ,झुंबर पोळ,जिवराज पोळ व शिवाजी देशमुख या भावकीतील वेगवेगळ्या जणांच्या नावे असणारी जमीन एकत्रीतपणे मंदीरासाठी दान दिल्याने या सर्व गावकऱ्यांचा सन्मान उपस्थित महंतांच्या हस्ते करण्यात आला. पुरूषोत्तम शास्त्री शेवलीकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाला माळंगी कर्जत येथील महंत इंगोलेकर बाबा बीडकर बुवा नाशीक,राजदेव बुवा शेवलीकर, विठ्ठल पाटील महाराज, बापूराव नाईकनवरे महाराज,बाळराजे महानुभाव जोगेश्वरी शेवलीकर सिनाताई शेवलीकर यांच्यासह माजी सरपंच विष्णुदास लबडे , मुरलीधर पोळ, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक सुरेश पोळ, अशोक लबडे, विलास पाटील, सुनील पोळ,बबन मोरे, शंकर पोळ, बन्सी चोरगे, कैलास लबडे, बाळासाहेब पोळ यांच्यासह गावातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.
