करमाळा प्रतिनिधी

बँक ऑफ इंडिया शाखा वीट, यांच्याकडून वृक्षारोपणासाठी जिल्हा परिषद शाळेला पाच हजार रुपयांची भेट.
आज दिनांक 15 /7 /2026 रोजी बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर व त्यांचे सर्व स्टाफ यांच्याकडून मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेली शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा वीट या शाळेस या शाखेकडून वृक्षरोपणासाठी पाच हजाराची मदत दिली. त्यामध्ये टर्मिनिया जातीची वृक्षारोपणाची पाचशे रुपये प्रति झाड या किमतीचे जवळजवळ दहा झाडे या शाखेकडून देण्यात आली.
गेल्या पाच वर्षांमध्ये या शाखेकडून वेळोवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट या शाळेला मदतीच्या रूपात बँकेकडून सहकार्य लाभलेले आहे, यापूर्वीही बँके कडून जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळे स्वातंत्र्यवीर , समाज सुधारक यांचे फोटो देऊन शाळेला मदत केलेली होती, शेवटी वृक्षरोपणासाठी आणलेल्या सर्व झाडांची बँक मॅनेजर , सभापती ,माजी सभापती व बँकेचे सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या हातून या वृक्षांची शाळेच्या समोरच्या बाजूस लागवड करण्यात आली .
यावेळी विद्यमान सभापती ढेरे, माजी सभापती मधुकर गाडे, बँकेचे सर्व कर्मचारी, महसूल खात्याचे वीट गावचे तलाठी श्री कदम साहेब, व आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी बँक मॅनेजर साहेबांचे व त्यांच्या सर्व स्टाफचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री अर्जुन ढेरे सर यांनी आभार व्यक्त केले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *