#आरक्षण उपवर्गीकरण त्वरीत रद्द करा महापुरुष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपशब्द मातंग नेते यांच्यावर गुन्हे दाखल करा. तालुकाध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे#
महाराष्ट्र युतीचे सरकार यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय 59 जातीचे 13 टक्के आरक्षण आहे. आरक्षण उपवर्गीकरण ही मागणी मातंग समाजातील मोजक्या स्वयंघोषित नेत्यांनी केलेली आहे. त्या मागणीस 58 जातीने व आंबेडकरवादी मातंग समाजाने कडाडून विरोध केला आहे. आरक्षण उपवर्गीकरण ही एक मागणी असताना सोशल मीडिया व स्वतंत्र व्यासपीठावर महार बौद्ध समाज संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व आंबेडकर घराने यांच्यावर काही RSS वादी भाजप सरकार नेते यांच्याकडून खालच्या पातळीवर टीका करून अपमानित करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विचारांचे भांडार आहे. देशाची अस्मिता आहे. आरक्षण जनक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आहेत. तमाम भारतीय जनतेची शरीराची चामडी सोलून त्याचे जोडे जरी आंबेडकर घराण्याने घातले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फिटणार नाहीत. हा महाराष्ट्र शिव, शाहू ,फुले, आंबेडकर,साठे यांच्या विचारांचा आहे. आज त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणुन मातंग नेते हीन भाषेत अपमानित करताय. ही नेतेमंडळी दुसरी तिसरी कोण नसून RSS संघाची भाजप सरकार नेते आहेत. तुमची मागणी संविधानाने दिलेल्या अधिकारातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाली आहे. ती तुम्ही करा पण आमच्या अस्मितेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मुळात आरक्षण उपवर्गीकरण ही मागणी 59 जातीची नाही एक मातंग समाज मोजकीच नेत्याची आहे. गाव गाड्यात सर्व जण गुण्यागोविंदाने राहत भाऊ बंधकी असताना समाजात फुट का पाडली जाते. मातंग समाजातील तरुण हा एकतर अर्धवट शिक्षण घेतो. परंपरेनुसार पोतराज होऊन अंधश्रद्धेवर जगतो मागसवर्गीय समाजाला व्यसनाधीन करणारे ही सरकार आहे. दारू गुट्टे झुगार ही वस्तीत आहे त्यामुळेच तरुण पिढी भरकटत आहे. समाजाला नवी दिशा देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करून आत्मसात करा खुप सुधारणा होईल तुमचे आरक्षण कोणी खाल्ले किवा पळवले नाही. आहे ते तिथेच आहे. ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून उगाच महार समाजाला 58 जातीला टार्गेट करू नका. तुमचे नेते सेटल आहेत तुम्हीही प्रगत असावेत ही आमची भावना आहे. मातंग बांधवाना विनंती आहे तुम्ही शिका संघटित व्हा संघर्ष करा. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून जर 58 जातीत फुट पाडत असाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल. फडणवीस सरकार यांना इशारा आहे रावा साठी गावचा विरोध घेऊ नका येणार्या काळात तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल एका साठी 58 जातीला सरकारने उरावर घेऊ नये आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ रद्द करा अशी मागणी साहेबराव वाघमारे यांनी तहसीलदार करमाळा यांच्या मार्फत. सामाजिक न्याय मंत्री. संजय शिरसाट व सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी ता.अल्प अध्यक्ष चंद्रकांत साळवे, प्रशांत उघडे, होलार समाजाचे नेते. संतोष माने, रामभाऊ खराडे, खाटिक समाजाचे. राहुल मुन्ना पलंगे, मातंग समाजातील दादा आरणे, नितीन आरणे, हणुमंत चांदणे, याकुब बागवान, दास दामोदरे,चर्मकार समाज. किरण कांबळे, मनोज कांबळे, आतेष सावंत, प्रथमेश सोनवणे, मंगेश लांडगे, रामा पांडव,शिवाजी शिंदे, तालुक्यातील अनेक समाजातील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या.