
करमाळा प्रतिनिधी
झरे या गावांमधून 47 वर्षापासून गावातील भाविक भक्तांच्या माध्यमातून आषाढी वारीसाठी दरवर्षी पायी दिंडीचे प्रस्थान केले जाते. प.पू. लक्ष्मण तात्या महाराज हे झरे या गावांमध्ये 50 वर्ष वास्तव्याला होते. त्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये झरे गावांमध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर रुजवले. प.पूज्य लक्ष्मण तात्या महाराज हे बालब्रह्मचारी होते. त्यांच्या प्रेरणेतून आषाढी वारीच्या पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या दिंडी सोहळ्याचे

प्रस्थान करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम व विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या उपस्थितात 19 जुलैला प्रस्थान होणार आहे. प.पू. लक्ष्मण तात्या महाराज पायी दिंडी सोहळा २०२६ झरे ते पंढरपूर या दिंडी सोहळ्याच्या नियोजन करणे करिता व निमंत्रण देण्यासाठी दिंडी नियोजनातील प्रमुख ग्रामस्थ व प्रमुख मंडळी यांनी विलासराव घुमरे सर यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण दिले. यावेळी यामध्ये शिवाजी पिसाळ, अर्जुन गुळवे, हनुमंतराव पाटील, अर्जून बागल, कुदळे महाराज, बापूराव बागल, बाळासाहेब कुलकर्णी, आजिनाथ गायकवाड महाराज, संजय घाडगे यांचा व इतर प्रमुख मंडळीचा विलासराव घुमरे सर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर उपस्थित होते.
