
करमाळा प्रतिनिधी
मोहरमच्या निमित्ताने करमाळा शहरात इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ अन्नदान वाटप व करमाळा शहरातील विविध कब्रस्तानात वृक्षारोपण भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. करमाळा शहरातील विविध कब्रस्तानात 101 झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी युसुफ आतार व मार्गदर्शक तालुकाध्यक्ष हाजी कलीम काझी सर, जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक नासीर कबीर, मौलाना सय्यद अली, मुफ्ती अबु रेहान, मौलाना सिकंदर, मौलाना मुजाहीद, मौलाना वाजीद, मौलाना अन्वर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना कलीम काझी सर यांनी सांगितले की, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस झाडांचा -हास होत चालला आहे त्यामुळे त्याचा परिणाम पर्यावरणावर व मानवी जीवनावर परिणाम होत चालला आहे. पाऊसाची कमी, उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे परिणामी हवामान बदल झाला आहे या गोष्टीचा विचार करून आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे.

यावेळी मुफ्ती अबु रेहान यांनी सांगितले की, वृक्षारोपण कार्यक्रम पुण्याचे काम असुन एक झाड लावण्याने त्यांच्यापासून मिळणारी सावली मानवाला आनंद देणारी आहे. त्या झाडापासून मिळाणारी फळे चाखायला मिळतात. त्यापासून मिळणारे उत्पन्न व ज्यांनी झाडे लावली आहेत. त्यांना अनेक वर्षे व मेल्यानंतरही पुण्य अखंड पणे मिळत राहतात प्रत्येक मानवाने आपल्या हयातीत एक तरी झाड लावावे असे आवाहन केले आहे.
करमाळ्यातील श्रीराम प्रतिष्ठान येथे मोहरम व राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकल मुस्लीम समाजचे मार्गदर्शक तालुकाध्यक्ष हाजी कलीम काझी सर आणि सावंत गटाचे नेते पैलवान गणेश सावंत यांच्या हस्ते अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सकल मुस्लीम समाजचे शहर अध्यक्ष जमीर सय्यद, सकल मुस्लीम समाज चे मार्गदर्शक समीर शेख, रोहित पवार फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, नगरसेवक हुमरान मुलाणी, सकल मुस्लीम समाजचे उपाध्यक्ष जहांगीर बेग, नायब तहसीलदार हाजी सादिक काझी, नायब तहसीलदार युसुफ बागवान, जेष्ठ पत्रकार नरसाळे, रमजान बेग, इम्तियाज पठाण, किरण दुरगाळे, अलिम खान, समशेर मदारी, फत्तु मदारी, अस्लम मदारी, उस्मान मदारी, रफीक मदारी, फिरोज मदारी, जमीर मदारी, रियाज मदारी, सलीम मदारी, जावेद मदारी.
……………………..
करमाळा शहरातील प्रसिद्ध नालसाहेब सवारीचे स्वागत व सर्व मुस्लीम समाजातील विविध कार्य करणारे पदाधिकारी यांचे फेटे बांधून आणि गाडगे बाबा महाराज यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रथमच मोहरमच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, आपसी भाईचा-याला दृढता व प्रेमभाव सर्व धर्मात शांततेचा संदेश देणारा उपक्रम हा योगायोगने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्य दिवशीच घडुन आला हा दुग्धशर्करा योग आहे व आपण खर्या अर्थाने आपण सर्व जण शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे त्यांचे खरे अनुयायी आहेत असा उपक्रम करमाळा शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिव जयंती उत्सव समितीतर्फे राबविण्यात आला. हा उपक्रम सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम कौतुकास्पद आहे कारण असाच सामाजिक सलोख्याचा उपक्रम गेल्या चाळीस वर्षापासून गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव मिरवणुकीत जामा मस्जिद ट्रस्ट आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने प्रत्येक गणेश मंडळावर पृष्पवृष्ठी व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येतो व शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांना समस्त मुस्लिम मावळे अभिवादन करून पुष्पहार अर्पण करतो. हा सामाजिक बंधुभाव करमाळा शहरातील सर्व धर्मात दिसुन येतो. या उपक्रमाबद्दल सकल मुस्लीम समाज करमाळा आपले मनःपूर्वक आभार मानतो – जमीर सय्यद (शहराध्यक्ष सकल मुस्लीम समाज करमाळा)