करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरात गेल्या पाच दिवसांपूर्वी मोहरमच्या पंजाची सवारीची स्थापना करण्यात आली. यामध्ये मोहीद्दीन तालीम, कुरेशी गल्ली, मौलालीनगर, खाटीक गल्ली, खडकपुरा येथे माहुले, भवानी पेठेतील लालन सवारी, कुंभारवाडा येथील अल्लाउद्दीन सवारी मोहल्ला गल्ली येथील फरीद मास्तरची सवारी, रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी, सुतार तालीम, झारेकरी सवारीची स्थापना करण्यात आली. दहा दिवसांपूर्वी भुईकोट किल्ल्यात नालसाहेब या मानाची सवारीची स्थापना करण्यात आली असून पाच दिवस सवारीच्या मिरवणूक काढण्यात आल्या असून सर्व सवारीनी शहरात सर्व ठिकाणी भेटी गाठी दिल्या.

यामध्ये भुईकोट किल्ला येथील मानाची नालसाहेब सवारीची करमाळा शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्व भक्तांनी जागोजागी फुलांची चादर नालसाहेब सवारीला घालून व रेवडीचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले तसेच भक्तांनी दर्शन घेतले तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेली कुंभाराची अल्लाउद्दीन साहेब सवारीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्व भक्तांनी रस्त्यावर दर्शन घेतले तसेच सायंकाळी डोल्याचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सुर्यकांत चिवटे यांचा डोला, आघाडीचा डोला मोहल्ला गल्ली, खाटीक गल्ली डोला आदीचा समावेश आहे.

सदर मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, मोहरम कमिटीचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, मिरवणूक प्रमुख सोहेल पठाण वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार,जाकीर वस्ताद, हाजी समीर शेख, जाफर घोडके, अमीरशेठ तांबोळी, सारंग परदेशी, हुमरान मुलाणी, बबन दुधाट, पोपट माहुले, मदारी, कुरेशी, आझाद शेख, मुकेश श्रीवास्तव, इस्माईल सय्यद, आलीम खान, सद्दाम घोडके, मोहन परदेशी, तौफिक शेख, अकबर सय्यद, आसिफ नालबंद, अशपाक जमादार, इन्नुस पठाण, इमरान पठाण, फिरोज बेग, समीर शेख, मैनुद्दीन शेख, आदींनी परिश्रम घेतले.

छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती व मोहरम उत्सव निमित्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, शिवजयंती उत्सव समिती तसेच बहुजन विचारी संघटना यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोहरम कमिटीच्या सर्व पदाधिकारीचा सत्कार पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आयोजक सचिन काळे, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक सचिन गायकवाड, नगरसेवक महादेव फंड,  मकाई सह.सा.का. चेअरमन दिनेश भांडवलकर, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, गणेश कुकडे, अतुल निर्मळ, सुहास पोळ, आंबेडकरवादी चळवळीचे अजय कांबळे, प्रसाद निंबाळकर, सुनील भोसले, बाळासाहेब झोळ उपस्थित होते.

यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोहरम निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. करमाळ्यात मोहरमची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. धार्मिक श्रद्धे बरोबरच सामाजिक सलोखा बंधुभाव राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवणारे कार्यक्रम शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज घेण्यात आला.यावेळी मुस्लिम समाजातील सर्व पदाधिकारीचा सत्कार करण्यात आला. शेवटी सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *