करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी MAH-MHT CET (PCB Group) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये ऋतुजा नितीन झिंजाडे हिने 93.37 पर्सेंटाइल, शिवांजली दिगंबर कुदळे हिने 90.84 पर्सेंटाइल तर सायली बापुराव वाघमारे हिने 80.23 पर्सेंटाइल गुण प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे यश शक्य झाले असून त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यीनाही प्रेरणा मिळणार आहे.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी माने, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *