
करमाळा प्रतिनिधी
नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. गोंडरे गावात दोन विद्यालय व डीसीसी बँकेची शाखा आहे. सीना कोळगाव प्रकल्प जवळच आहे. नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी जातात तसेच आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी, प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे जातात तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर, पुणे, मुंबई इतर ठिकाणी

जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी शिक्षणासाठी येणे जाण्यासाठी बसची अत्यंत गरज आहे. त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे,कोळगाव, निमगाव,गौंडरे,नेरले, वरकुटे, बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी मंजूर असून ती बस काही दिवस बंद केली होते ती पुन्हा सुरू करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुंबई येथे निवेदन दिले व मंत्री यांनी बस सुरू करण्याचा आदेश दिल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वतीने आभार आणि नागरिकांनी बसने प्रवास करून लाभ घ्यावा असे आवाहन, नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.


