करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहर व तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले राज्यभर नाव असलेल्या करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर मिरवणूक प्रमुख पदी पैलवान सोहेल पठाण यांची मिरवणूक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली नालबंद मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमीर शेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, जाफर घोडके, पैलवान इमरान वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नालसाहेब दर्ग्याचे मुजावर अलीम खान, राजू सय्यद, इस्माईल सय्यद, पैलवान सलमान घोडके, सारंग परदेशी, पप्पू सय्यद, अमर शेख, बिलाल कुरेशी, आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यंदाच्या मोहरम उत्सव समितीच्या बैठकीमध्ये बहुसंख्य मुस्लिम व हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला होता. मोहरम उत्सव हा पारंपारिक पद्धतीने करमाळा शहर व तालुक्यात पार पाडण्यात येत असतो. कायद्याचे पालन व संविधानाच्या अधीन राहून पारंपारिक वाद्य मध्ये मिरवणूक काढून हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो.

बुधवार दिनांक 17 जून रोजी या मोहरम सणाच्या उत्सवात सुरुवात होत असून या दिवशी मानाची नालसाहेब सवारीची स्थापना भुईकोट किल्ल्यात करण्यात येणार आहे. यानंतर इतर सवाऱ्यांची स्थापना होऊन सर्व सवाऱ्यांचे विसर्जन 26 जून रोजी होणार आहे. या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधवांच्या सवाऱ्यांचा व डोल्याचा (ताबूत) अंतर्भाव असतो. यामध्ये रजपूत समाजाची सुतार तालीम सवारी, लिंगायत समाजाची माहुले यांची सवारी, कुंभार समाजाची सवारी, रंभापुरातील दुधाट यांची सवारी, चिवटे यांचा डोला आदी डोले व सवाऱ्यांचा यामध्ये समावेश असतो. सदरचा मोहरम उत्सव हा शांततामय व उत्साहात साजरा करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सुफरान शेख, भैय्या परदेशी, केतन परदेशी, फारुख कुरेशी, इरफान सय्यद, निहाल शेख, युसुफ शेख, अख्तर शेख, जावेद शेख, समीर शेख, शाहरुख नालबंद, भैया परदेशी, सलीम मदारी, सादिक सय्यद, जावेद झारेकरी, दिलावर मुलाणी आदि कार्यकर्ते. मोठ्या संख्येने मुस्लिम व हिंदू बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *