करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या लोडशेडींगचा फटका बसत असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेली पिके धोक्यात आली आहेत यामुळे शेतीपंपासाठी आठ तास वीज देण्याची मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी एका मोर्चा द्वारे शासनाकडे केली आहे. महाविरतणकडून होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी करमाळा येथे तहसिल कचेरीवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये आमदार नारायण आबा पाटील हे स्वतः सहभागी झाले होते. श्री दत्त मंदीरासमोरुन या मोर्चास सुरुवात झाली. शेवटी हा मोर्चा करमाळा तहसिल कार्यालयावर येऊन थडकला. यावेळी महावितरणच्या बार्शी विभागाचे

कार्यकारी अभियंता मगर, तहसिलदार शिल्पा ठोकडे, महावितरण जेऊर विभाग उपकार्यकारी अभियंता भोयर, करमाळा विभाग उपकार्यकारी अभियंता कलावते यांनी आमदार नारायण आबा पाटील यांनी दिलेले निवेदन स्विकारले. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे त्यास वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतातील पिके जमिनदोस्त झाल्याने फार मोठा फटका बसला आहे तर दुसरीकडे महावितरण कडुन झालेल्या वीज कपातीमुळे हातातील पिकांना धोका निर्माण झाल्याने आणखी एका आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महावितरण कंपनीने सर्वाना

समान न्याय या तत्वावर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आठ तास अखंडीत व पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा यासाठी आजपासून अंमलबजावणी करावी असे सांगितले. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. या मोर्चात कृषीभूषण दादासाहेब पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, भाऊसाहेब गोडसे, पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती अतुल पाटील, स्वप्निल काळे, ज्ञानेश्वर बिचीतकर यांचेसह आदिनाथ माजी संचालक धुळा कोकरे, विद्यमान संचालक डॉ. हरीदास केवारे, संचालक देवानंद बागल, उपाध्यक्ष महेंद्र पाटील,

संचालक रविकिरण फुके, संचालक विजय नवले, दत्तात्रय देशमुख, राजाभाऊ कदम, आबासाहेब अंबारे, दत्तात्रय गव्हाणे, किरण कवडे, संतोष पाटील, रामेश्वर तळेकर, श्रीमान चौधरी, प्रा. डॉ संजय चौधरी, माजी संचालक रविभाऊ कोकरे, सरपंच पृथ्वीराज पाटील, प्रमोद बदे, सोमनाथ देवकाते, मौलाना मुलाणी, सरपंच विकास गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन शिंदे, भैय्यासाहेब शिंदे, गहिनीनाथ दुधे, सरपंच संजय गलांडे, केडगावकर पाटील, सरपंच अमर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दराडे, नाना गोडगे, माजी सरपंच संदीप मारकड, विलास बयडे, मकाई संचालक गोवर्धन करगळ, स्वीय सहाय्यक संजय फडतरे, आबासाहेब गायकवाड, शशिकांत नरुटे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *