
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय कुंभारगाव तालुका करमाळा या प्रशालेस माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व पतसंस्थेचे संचालक नवनाथ मोहोळकर, जवान सिंह राजपूत, प्राचार्य योगेश दळवी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन भोसे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संगोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर, भिलारवाडी हायस्कूलचे कैलास फरतडे सर, शाळेतील विठ्ठल दवणे, नवनाथ गोसावी, दत्तात्रय राऊत, रावजी धांडे, नानासाहेब भालशंकर, सतीश ढवळे, नवनाथ गायकवाड हे उपस्थित होते.