करमाळा प्रतिनिधी

करमाळा ते हिवरवाडी रस्त्याचे काम आठ दिवसांमध्ये चालू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला. वीस ते पंचवीस वर्षे झाले या रस्त्याचे काम झालेले त्यानंतर या रस्त्याकडे कोणीही पाहिले नाही. प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे काना डोळा केला आहे.

या रस्त्याने शाळकरी मुले, हिवरवाडी, भोसे, वडगाव, शेळके वस्ती, दगडवाडी, रावगाव या गावातील ग्रामस्थ ये-जा करत आहेत. अनेक प्रवाशांचे या रस्त्यावरून प्रवास करताना अपघात झालेले आहेत. काही प्रवाशांना हातपाय गमवावे लागलेले आहेत. रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. अशा या जीव घेण्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी प्रवास करत आहेत. प्रशासन एखाद्या शालेय विद्यार्थ्यांची जीव जाण्याची वाट बघत आहे का अनेक वेळा या रस्त्यासाठी

रस्ता रोको धरणे आंदोलन तहसील कचेरी समोर ठिय्या आंदोलन असे अनेक आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही जर या आठ दिवसांमध्ये करमाळा ते हिवरवाडी रस्त्याचे काम न झाल्यास करमाळा कर्जत रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी सरपंच बापू पवार, वडगावचे सरपंच महादेव गायकवाड, बाळासाहेब अडसूळ, बापू वाडेकर, संजय सुरवसे, आजिनाथ इरकर, कैलास पवार, गणेश इवरे, भालचंद्र इवरे, नंदू इरकर, सौरभ पवार, सोपान पवार, राजेंद्र मेरगळ, चिमाजी पवार, आदि जन ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *