करमाळा प्रतिनिधी

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली


शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. विशेषतः अभियांत्रिकी व उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यांचे कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी राहील.

डॉ. डी. वाय. पाटील साहेब हे आमचे निकटचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या निधनाने आम्हाला वैयक्तिक दुःखही झाले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करताना ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना.
..
.प्राचार्य जयप्रकाश बिले, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, करमाळा.

सचिव, उच्च शिक्षण संस्था संघटना सोलापूर विद्यापीठ, सोलापूर .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *