
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील यांनी सतर्क राहुन सर्वात अगोदर पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेतली असुन त्यानुसार प्रशासन कार्यवाही साठी पाऊल टाकत आहे. आता यापुढे उशीरा जाग येऊन जर कोणी राजकीय फार्स म्हणून पाणी टंचाई आढावा बैठक घेत असतील त्यांना कोणीही रोखु शकत नाही. असे प्रकार म्हणजे वराती मागुन घोडे यासम असतील असा टोला आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी मागील काही दिवसांपूर्वी करमाळा मतदारसंघातील पाणी टंचाई बाबत एका बैठकीतुन आढावा घेतला असुन नेमके

यावर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की, आमदार नारायण आबा पाटील हे कायमच करमाळा मतदारसंघातील संभाव्य नैसर्गिक संकटाबाबत सतर्क असतात. याच माध्यमातून ते संबंधित खात्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन पुढील चर्चा करत असतात. या अगोदर अनेकदा त्यांनी पाणी टंचाई, पावसाळा पुर्व महावितरण नियोजन बैठक, खरीप व रब्बी हंगाम पुर्व कृषी खाते बैठक, कुकडी व दहिगाव उपसा पुर्व नियोजन बैठक, उजनीकाठ व भीमा सीना जोडकालवा परिसरातील वीज कनेक्शन बाबतची पुर्वकाळजी बैठक, उजनी बाबत पुर्व नियोजन पाणी परिषद, कुकडी व दहिगाव कालवा सल्लागार समिती बैठक, करमाळा तालुक्यातील मांगी प्रकल्प पाणी सल्लागार

समिती बैठक अशा अनेक बैठका घेऊन उपाययोजना केल्या आहेत. याचे परिणाम सुध्दा जनतेला प्रत्यक्षात दिसुन आले आहेत. करमाळा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांना भेटी देणे, अवकाळीमुळे पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी करणे व शेतकऱ्यांना धीर देणे ही जबाबदारी सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी समर्थपणे पेलली आहे. याशिवाय यावर कार्यवाही करुन शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. यामुळे आता करमाळा मतदार संघातील पाणी टंचाई बाबत इतर लोकप्रतिनिधी अथवा राजकीय गट बैठकी घेऊन काही प्रयत्न करत

असतील तर त्याबाबत आमचे काही दुमत नाही. परंतु ज्यावेळी शेतकरी संकटात सापडला होता त्यावेळी ही मंडळी कुठे गायब होती. यातील काहीजण काचेच्या बगंल्यात स्वतःला सुरक्षित करुन शेतकऱ्यांना उघड्यावर टाकत होती. तर काहीजणांचे पर्यटन दौरे सुरु होते. यामुळे असली राजकीय स्टंट बाजी जनता ओळखुन आहे. करमाळा मतदार संघातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बैठक झाली असुन त्यानुसार नियोजन करण्यासाठी प्रशासन कामालाही लागले असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.