करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, करमाळा ने इ. १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. महाविद्यालयाचा निकाल – 99.35% लागला आहे. यावर्षी इ. १२ वी बोर्ड परीक्षेस एकूण ३०८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी

हर्षदा हनुमंत जमदाडे ८७.३३% गुणांसह प्रथम क्रमांक, वैभवी उमेश पवार ८३.००% गुणांसह द्वितीय क्रमांक, प्रणिती पोपट मोहोळकर ८३.००% गुणांसह द्वितीय क्रमांक, स्नेहल भाऊसाहेब शिंदे, ८२.३३% गुणांसह तृतीय क्रमांक

विशेष अभिमानाची बाब

मंगल गोपीनाथ कोंडलकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांचे अभिनंदन करमाळा तालुक्यातून होत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, प्राचार्य बी. के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक एम. आर. कांबळे, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही. एल. पवार, उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *