करमाळा प्रतिनिधी

प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नियोजन केल्यास नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही,असे मत आमदार नारायण आबा पाटील यांनी मांडले. जेऊर येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. करमाळा विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई निवारणार्थ जेऊर ता. करमाळा येथे एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे होते. तर यावेळी व्यासपीठावर करमाळा तालूक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, माढा तालूक्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे, माढ्याचे नायब तहसीलदार संजय जाधव, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख उपअभियंता वाघमारे ए एस (माढा), पाणी पुरवठा उप अभियंता वाल्हेकर, तालूका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, वनपरिक्षेत्र अधिकारी घोडके (मोहोळ), पशुसंवर्धन अधिकारी यादव, सर्व विस्तार अधिकारी, मंडल

अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचेसह जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, जि.प. सदस्य लक्ष्मण गोडसे, सावंत गटाचे नेते राहुल सावंत, संचालक हरीदास केवारे डॉक्टर, संचालक कृषीभूषण दादासाहेब पाटील, आदिनाथ उपाध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचीतकर, पंचायत समिती सदस्य धनंजय शिरस्कर, आदिनाथ संचालक देवानंद बागल, राजाभाऊ कदम, श्रीमंत चौधरी, रविकिरण फुके, विजय नवले, नितीनराजे राजेभोसले, माजी उपसभापती संजय जाधव सर, संचालक दत्ताआबा गव्हाणे, सरपंच विकास गलांडे, संचालक आबासाहेब आंबारे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, प्रमोद बदे, भीमराव घाडगे, अण्णा सुपनवर,

गणेश घोरपडे, सतीश कानगुडे, नागनाथराव पाटील (केडगावकर), किरण पाटील, नाथराव रंदवे, सोमनाथ देवकाते, राजाभाऊ शिंदे (तांदुळवाडी माढा), तात्या काळे, दादासाहेब भांडवलकर, चंदर्भान पालवे, संतोष कोपनर, सरपंच राजु भोसले राजुरी, आदि उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्या गावातील संभाव्य पाणी टंचाई बाबत माहिती दिली. तसेच तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी करमाळा तालुक्यातील त्यांच्याकडे प्राप्त गावनिहाय पाणी टंचाई बाबत माहिती देऊन उपाययोजना करण्याबाबतची हमी दिली. तर आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रशासनाला सतर्क राहुन पाणी टंचाई अहवाल तसेच प्राप्त पर्याय याची तपशीलवार माहिती वरीष्ठ कार्यालयास कळवुन पुढील उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले तर आभार सरपंच विकास गलांडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *