करमाळा प्रतिनिधी

कंदर सातोली येथील अडवलेला शिवरस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा आत्मदहन करु असे निवेदन जिल्हाधिकारी यांना तसेच करमाळा नायब तहसीलदार लोकरे व जाधव यांना शेतकऱ्यांनी दिले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, वरील विषयास अनुसरून आम्ही सर्व रा. सातोली, कंदर येथील शेतकरी असून आमच्या जमिनी कंदर सातोली सीमेलगत असून हा शिव रस्ता गेली पुर्वपार अस्तित्वात आहे. परंतु गेली तीन वर्षापासून बिभीषण उर्फ दादा कृष्णा फरतडे, संतोष दादा फरतडे, गणेश चंद्रकांत फरतडे, दीपक चंद्रकांत फरतडे हे रस्त्यावर अडवणूक करत आहेत त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन मोडखळीस आला आहे. व गतवर्षी झालेल्या पावसाने हा रस्ता मध्येच वाहून गेला आहे. तो

रस्ता भरण्यासाठी वरील लोक अडवणूक करत आहेत. हा रस्ता ते भरू देत नाहीत. आम्ही एस.आर./०५/२०२३ क्रमांकाने तहसीलदार यांच्याकडे हा रस्ता सीमा कायम करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मात्र 3 वर्षापासून महसूल खात्याकडून कोणतीही मदत झाली नाही. अथवा पाहणी सुद्धा करण्यात आली नाही. सध्या हा रस्ता बंद पडल्याने आमच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. शिवाय या रस्त्यावर शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचे आर्थिक, शैक्षणिक मोठे नुकसान झाल्यामुळे आम्ही हताश झालो असून जगणे नकोशे झाले आहे. अशी आमची सध्या मानसिकता झाली असल्याने आपण आपल्या खात्यामार्फत संरक्षण देऊन सदरचा रस्ता पाच मार्च पर्यंत भरून द्यावा अन्यथा सहा मार्च रोजी याच रस्त्यावर आम्ही आमच्या पत्नींसह आत्मदहन करू याची आपण गाभिर्याने दखल घ्यावी. पुढे होणाऱ्या अनर्थास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

यावेळी सिद्धेश्वर गोडसे, नागनाथ चव्हाण, अजित फरतडे, संतोष पवार, सचिन यादव, दादासाहेब साळुंखे, राजेंद्र जगताप, दशरथ बारबोले, शिवाजी साळुंखे, आदीजण उपस्थित होते.

मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर, प्रांताधिकारी कुर्डुवाडी, उपपोलीस अधीक्षक करमाळा, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना प्रति इमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *