करमाळा प्रतिनिधी

केळी व कांदा पिकांना तीन हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळवा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. केळी पिकासाठी एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे, कांदा पिकासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येत आहे, केळीचा भाव चार ते पाच रुपये व्यापारी शेतकऱ्याकडून घेत आहेत, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, केळीला रासायनिक खताचा खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे,

शेतकऱ्याकडून चार ते पाच रुपये किलोने केळी घेतली जात आहे आणि पुढे ग्राहकांना 40 ते 50 रुपये डझन केळी विकली जात आहे, शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये केळी घेतली जात आहे पुढे व्यापाऱ्यांना ज्यादा दरामध्ये दिली जात आहे, चिलींग दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कांदा पिकासाठी लागवड खर्च खुरपणी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये झालेली वाढ यामुळे कांदा उत्पादक शेतकरी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च करत आहे आणि कांद्याचा चालू बाजार पाच ते सहा रुपये किलोने कांदा मार्केटमध्ये घेतला जात आहे. शेतकऱ्यांना नफा मिळतच नाही परंतु खर्चच ज्यादा होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व कृषिमंत्र्यांनी चालू अधिवेशनामध्ये केळी आणि कांदा या पिकांना हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे त्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *