करमाळा प्रतिनिधी

इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेमध्ये नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा गौरव वाढवला आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १९ विद्यार्थी यशस्वी झाले, ही अत्यंत अभिमानास्पद व आनंदाची बाब आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांसोबतच मार्गदर्शक शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन व परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रेरणादायी नेतृत्व, संस्थेचे पदाधिकारी यांचे भक्कम पाठबळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ झरे, सर्व संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व झरे ग्रामस्थ व पालक या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Nmms निकाल पुढीलप्रमाणे

ज्ञानदा घाडगे –127, सोनल घाडगे -121, प्रांजली घाडगे -114, तनया मुटके -110, धनश्री आमृळे -110, नंदिनी घाडगे -108, वैष्णवी भांगे -107, अनुष्का मावलकर-104, श्रद्धा पवार -96, महावीर मावलकर -96, कार्तिकी कुदळे -91, श्रेयस लोखंडे -90, संस्कृती वळेकर 89, समर्थ ननवरे -85, प्राची आवटे -83, समर्थ गायकवाड -77, अनुज कळसाईत-76, सानिका घाडगे -72, ओंकार जाधव 72

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *