करमाळा प्रतिनिधी

सावडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने आणि ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास दत्तात्रय एकाड यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी विकास हा मुख्य मुद्दा असणार असून, गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज व्यवस्था तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना एकाड म्हणाले की, “गावाच्या प्रगतीसाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विकासकामांच्या जोरावर आम्ही विजय निश्चित करू.”

गावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि जनतेला उत्तरदायी कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गावात निवडणुकीची चर्चा रंगू लागली असून विविध पॅनलांकडून हालचालींना वेग आला आहे, सावडी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *