
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेने प्रस्तावित घरपट्टीवरील व्याजात मोठी वाढ केली आहे, ती वाढ मालमत्ता धारकांना आर्थिक भुर्दंड देणारी आहे. तरी ही वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मालमत्ता करावरील व्याज माफ करून मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, अश्विनी कांबळे-अब्दुले, सुवर्णा आलाट, साजेदा कुरेशी हे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

