करमाळा प्रतिनिधी

संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे तिथी नुसार 6 मार्च शुक्रवार रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या उत्सवात सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवसेना शिवजयंती मध्यवर्ती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत उर्फ (पप्पू) राखुंडे तर कार्याध्यक्षपदी शिवसेनेचे ता.प्रमुख डॉ. गौतम रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यानिमित्ताने तुळशी वृंदावन, श्री कमलादेवी रस्ता येथे शिवजयंती उत्सव देखावा उभा करण्यात येणार असून आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, मोफत अवयव वाटप, शिवकालीन साहसी मैदानी खेळाचे सादरीकरण, महिलांसाठी खेळ पैठणी, शिव व्याख्याने समाजातील आदर्श महिला व नागरिकांचा सत्कार अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मोहिनीताई संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड, शिवसेना (उबाठा) ता.प्रमुख सुधाकर काका लावंड सह सर्व नगरसेवक पदाधिकारी सर्व पक्षांचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवजयंती मिरवणुकीसाठी सजीव देखावा मिरवणुकीत सहभागी होणार असून हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम करीत आहेत.

या शिवजयंतीच्या निमित्ताने श्री कमला देवीचा रोडवर श्री स्वामी समर्थ स्मारक शिवसेनेच्या वतीने उभारण्यात येणार असून त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून शिवजयंतीची शोभा वाढवावी अशी विनंती कार्याध्यक्ष डॉक्टर गौतम रोडे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *