
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुक्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय पातळीवर आशा समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करण्यासाठी करमाळा तालुका नागरी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून समिती तर्फे पुढील मागण्या सोडवण्यासाठी तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, करमाळा, नगरपालिका व एस. टी. डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले.

1. जयप्रकाश नारायण टाऊन हॉल व त्यासमोरील जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याची दुरवस्था झालेली असून जयप्रकाश नारायण टाऊन हॉल ची पुनर्निर्मिती त्वरित करण्यात यावी.
3. नागरिकांच्या आरोग्यासाठी करमाळा शहरांमध्ये आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने भूमिगत गटार योजना तरीत कार्यान्वित करण्यात यावी.
4. पुणे रोड ते जिल्हा परिषद विश्रामगृह ते दत्त मंदिर या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत शिवाय पुणे रोड ते जिल्हा परिषद विश्रामगृह या रस्त्यावर जास्त रुंदीचे दुभाजक आहेत ते काढून रस्ता सुस्थितीत करणे आवश्यक आहे लवकरात लवकर सदरचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
5. देवीचा माळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या रस्त्याचे नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु सदर रस्त्यावर दुभाजक नाहीत त्यामुळे अपघातांची शक्यता आहे सदर रस्त्यावर त्वरित दुभाजक तयार करून त्यामध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी.

6. शुक्रवारचा आठवडी बाजार पुणे रस्ता व मंडईच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर भरत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. त्यामुळे नवीन भाजी मंडईच्या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यात यावा.
7. कोणत्याही सार्वजनिक समारंभामध्ये लग्न, जयंती, सण-उत्सव इत्यादी कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश वाध्ये वाजवण्यास मनाई करण्यात यावी.
8. करमाळा आगारात बहुतेक बसेस जुन्या आहेत. त्या प्रदूषण करतात. आशा बसेस बदलण्यात याव्यात.
9. करमाळा एस. टी. स्टँड परिसर दररोज स्वच्छ करण्यात यावा.
10. एस. टी. बसेसवर नामफलक व्यवस्थित असावेत.
11. एस. टी. बसेस वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी थांबवू नयेत
याप्रसंगी प्रकाश लावंड, प्रा. नागेश माने, विवेक येवले, लक्ष्मण लष्कर, डॉ. जयंत कापडी, भारत वांगडे, शंकर कुलकर्णी, ॲड. सविता शिंदे इ. उपस्थित होते.