करमाळा प्रतिनिधी

रासप च्या देवकते, रंदवे यांच्या रिक्षा ला तर शेख यांच्या कपाट चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे. आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू- माजी मंत्री महादेव जानकर..
करमाळा तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता आज करमाळा तालुक्यातील कोर्टी-केत्तूर, पांडे, हिसरे, अर्जुननगर, म्हसेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांनी गावभैटी देऊन त्या भागातील समस्या जाणून घेतल्या.रासपचे हिसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार देवकते अंगद विश्वनाथ, केत्तूर-कोर्टी पंचायत समिती गणाचे ॲड जमीर कलिंदर शेख तर पांडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गुणाबाई विष्णू रंदवे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री महादेव जानकर साहेब आले होते.त्यांनी विविध भागातील गावांना भेटी दिल्या. यावेळी जानकर साहेब म्हणाले की, तालुक्यात प्रचंड खराब रस्ते आणि धुळीचे रस्ते आहेत.आबा,दिदि,मामा काहीच कामाची नाहीत.यांनी तालुका भकास केला आहे.त्यामुळे आशा दलबदलू स्वार्थी लोकांना पाडल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही.आमच्या सारख्या नवीन पाक्षाला संधी द्या. आमचे रासपचे सर्व उमेदवार निवडून द्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करू.गाव खेड्याला जोडणारे चांगले रस्ते देऊ, स्वच्छ पाणी, उत्तम आरोग्य, आणि चांगले शिक्षण देऊ, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मोफत लायबरी सुरू करू, आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट देऊ.आम्ही वंचित घटकातील कष्टकरी,गोर-गरीब लोकांसाठी झटत आहोत. आपले मत विकू नका चांगल्या आणि कामाच्या माणसाच्या मागे राहा. आसे उद्गगार माजी मंत्री महादेव जानकर यांनी गावाभेट दौऱ्या प्रसंगी केले. याप्रसंगी राषप पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
