
करमाळा प्रतिनिधी
आहिल्यादेेवी विद्यापीठ, सोलापूर चे सीनेेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबाची वाडी याठिकाणी किशोर-किशोरी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट प्रशालेने सेमी फायनल सामन्यात वाडीकुरोली संघास तर अंतिम सामन्यात वाफळे संघास पराभूत करून प्रथम क्रमांकाचे रोख 11 हजार रुपयांंचे बक्षीस व ट्राॅफी पटकावली.गतवर्षी याच स्पर्धेत मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस व ट्राॅफी मिळविली होती. या वर्षी ही कामगिरी मुलींच्या संघाने करून विजयाची परंपरा कायम राखली.याबद्दल संस्था व प्रशाला यांनी सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक दादासाहेब बरडे सर,गोरख ढेरे सर व विनोद ढेेरे सर यांचे अभिनंदन केले.
