
करमाळा प्रतिनिधी
पांडे जिल्हा परिषद गटामधून महाराष्ट्र चॅम्पियन महिला कुस्तीगीर पल्लवी दत्तात्रय सुपनवर यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पल्लवी सुपनवर म्हणाल्या की, करमाळा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील दहा वर्षांमध्ये जिल्हा परिषद सदस्य यांनी

कुठल्याही प्रकारचे विकास कामे केले नसल्यामुळे मला कुस्ती मैदानातून राजकीय मैदानात उतरावे लागत आहे. माझी लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई आहे. पांडे जिल्हा परिषद गटातील मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी लढावा उभा करणार. पांडे जिल्हा परिषद गटामधील वाड्या वस्तीवरील रस्त्याची कामे करणार आमच्या सुपनवर घराण्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. आमचे आजोबा स्व. पांडुरंग सुपनवर करमाळा पंचायत समितीचे बिनविरोध सदस्य होते. पंधरा वर्षे पांडे ग्रामपंचायतचे सरपंच होते. 35 वर्षे सलग पांडे ग्रामपंचायत वरती वर्चस्व होते. माझे चुलते अण्णासाहेब सुपनवर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. पांडे जिल्हा परिषदेमधील मतदार हे जागृत आहेत. माझ्यासारख्या लाल मातीतून आलेल्या कुस्ती क्षेत्रातील मल्लाला स्वीकारतील. त्यांचा मतरूपी आशीर्वाद मला देतील असा विश्वास वाटतो.