
करमाळा प्रतिनिधी
उजनी जलाशय काठावरची अतिक्रमण मोहीम तात्काळ थांबवावी म्हणून भिमा उपसा सिंचन विभाग, भिमानगर ता. माढा येथील कार्यकारी अभियंता डुंबरे यांना उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा व इंदापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी करमाळा तालुक्यातून प्रा. शिवाजी बंडगर, शहाजीराव देशमुख, धुळाभाऊ कोकरे, विठ्ठल शेळके, हनु यादव, दत्ता टकले, तसेच इंदापूर तालुक्यातून अंकुश आप्पा पाडुळे, निलेश देवकर, काकासाहेब मांढरे व आदी जण उपस्थित होते.

