
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील मुंबई, सोलापूर सह महाराष्ट्रील सर्व महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल करमाळा येथे विद्यानगर येथील मध्यवर्ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल, भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश बापू निळ, कल्याण सरडे, भाजपाचे युवा

मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, रेवणनाथ निकत, स्वप्निल गोडगे, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन डॉक्टर विजय रोकडे, महादेव गायकवाड, प्रदीप वाघमोडे त्याचबरोबर उंदरगाव येथील सरपंच, सरचिटणीस युवराज मगर आदींच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटप करून भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
