
करमाळा प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस अधिकारी आय.पी.एस. अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक, महिला ए. पी. आय. गिरीजा मस्के मॅडम, करमाळा उपविभाग पी. एस. आय. सारिका गटकूल मॅडम, पोलीस हवालदार मंगेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गुटाळ, महिला पो. कॉन्स्टेबल विद्या इंगोले यांनी रेजिंग डे निमित्त महाराष्ट्र दिन निमित्त काही शाळांना आमंत्रित केले होते. यामध्ये करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी निर्भया पाथकाला भेट दिली. यावेळी आय. पि. एस. अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला व कायद्याविषयी अनमोल असे मार्गदर्शक केले. मंगेश पवार यांनीही

विद्यार्थ्यांना खुप मोलाचे मार्गदर्शक केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वतः बनवलेले गुच्छ व ग्रीटींग्स देऊन अंजना कृष्णा मॅडम यांचा सन्मान केला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून निर्भया पथक व पोलीस यंत्रनेचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी यशकाल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, स्कूल समन्वयक सतिश कोंडलकर सर, शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली व तेथील सर्वांगीण माहिती घेतली. ए. पी. आय. अधिकारी मस्के मॅडम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुली व महिलांच्या सुरक्षेविषयी संपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमासाठी निर्भया पथकामधील संपूर्ण स्टाफ यांचे खुप सहकार्य लाभले. यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
