
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास वीट जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने लढवूत असा निर्धार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांच्या पत्नी शितल शशिकांत पवार यांनी बोलून दाखविला. पुढे त्या म्हणाल्या कि, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ असून माझे सासरे स्व.आनंदराव पवार यांचे कडून पक्षनिष्ठेचे व प्रामाणिकपणेचे धडे घेतले आहेत. त्यांनी केंद्रियमंत्री

नितिनजी गडकरी, स्व.प्रकाशजी महाजन, स्व.गोपिनाथजी मुंडे, सुनिलजी कर्जतकर, सुभाष बापू देशमुख यांचे बरोबर काम करित असताना सोलापूर जिल्हा हा काॕग्रेसचा बालेकिल्ला असतानासुध्दा भाजपचे वेगळे अस्तित्व राखून ठेवले. माजी आमदार स्व.रावसाहेब पाटिल यांचे आमचे सासरे हे विश्वासू सहकारी मानले जात. मी ग्रामपंचायत सदस्य व सिना कृषी शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष असून शासकीय हमीभाव यासाठी शेतकऱ्यांना जास्त हमीभावाने धान्यास विक्रीची व्यासपीठ निर्माण करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ मिळेल याचेही काम पाहत असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध लाभ देण्याची आमची शेतकरी उत्पादन कंपनी काम करते

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून दिला आहे. पूरग्रस्त, तहसिल, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, अनेक शासकीय कार्यालयात जिथे जिथे सर्वसामान्य व्यक्तींचे कामे नडलेत तेथे न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. मी निवडून आलेस शासकीय कर्मचारीसाठी निवास्थान जेणेकरून नागरिकांचे गावातच कामे व्हावीत. आरोचे पाणी व शासकीय सर्व सोईयुक्त दवाखाना हा मानस आहे. माझे पती भाजपा उपाध्यक्ष हे गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य शिबिरे, कामगारासाठी मेळावे, विविध दाखले मिळण्यासाठी मेळावे, विद्यार्थ्यांचे एस टी चे प्रश्न असे विविध कामे करित आहोत. यामुळे भाजपा उमेदवारच या ठिकाणी निवडून येणार आहे.