
करमाळा प्रतिनिधी
केम-ढवळस रस्ता कारपेट करण्यासाठी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांना प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केम-ढवळस रस्ता अतिशय खराब झाला असून वाहतूक करणे अवघड झाले आहे. गतवर्षी पाऊस जास्त झाल्याने रस्ता अतिशय खराब झालेला आहे. रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. सदर रस्ता शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा असून तो दुरुस्त होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांना कुर्डुवाडीला जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे. तरी सदर रस्त्यावर लवकरात लवकर कारपेट टाकण्यात यावे. अन्यथा प्रहार स्टाईलने आम्ही आंदोलने करू.
