करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मूळचे हिसरे येथील रहिवासी तसेच भीमानगर येथे स्थायिक झालेले शेख कुटुंबातील कै.जावेद शेख यांची कन्या कुमारी तब्बू जावेद शेख हिने नुकत्याच संपन्न झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे तिने एमपीएससी मधून सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शेख हिला एकूण 253 मार्क मिळाले आहे.

तब्बू शेख हिचे शालेय प्राथमिक शिक्षण भिमानगर तालुका माढा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले असून माध्यमिक शिक्षण भिमानगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण इंदापूर येथील नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये झाले तर इंदापूर येथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून बीए ही पदवी संपादन केली.

विशेष करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वडिलांचे छत्र छाया हरपले असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता जिद्द व चिकाटीच्या मेहनतीवर व अथक परिश्रम तसेच नियमित अभ्यास या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.

आजच्या विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करून भविष्यात आपले नाव कमवावे असा संदेश त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांना दिला. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *