नागपूर प्रतिनिधी

नागपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, (8848.86 मीटर) तसेच मकालू, (8485 मीटर) मनासलू (8163 मीटर) आणि लोहसे (8516 मीटर) ही ८००० मीटरपेक्षा अधिक उंचीची चार शिखरे यशस्वीरीत्या सर केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. शिखर माउंटची चार शिखरे सर करणारे कोंढेज तालुका करमाळा येथील सुपुत्र नागपूर येथे कार्यरत असलेले देशातील एकमेव पोलीस अधिकारी असून ते मूळ गाव कोंढेज तालुका जिल्हा सोलापूर येथील असून या उल्लेखनीय आणि दुर्मीळ पर्वतारोहण कामगिरीबद्दल त्यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये करण्यात आली आहे.

या कामगिरीबद्दल नागपूर शहर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल (भा.पो.से.), पोलीस सह आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सिंग परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी एपीआय ननवरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

ननवरे यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलिस दल आणि नागपूर पोलिसांचे नाव भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *