
करमाळा प्रतिनिधी
शिख संप्रदायाचे आद्य गुरु श्री गुरु नानक देव यांची ५५६ वी जयंती करमाळा शहरातील सिंधी समुदायाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील दत्तपेठ येथील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात शहरातील सर्व सिंधी समाज बांधवांनी श्री गुरु नानक देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि धार्मिक सोपस्कार पार पाडून मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा केली. यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित महाप्रसादावेळी शहरातील सर्व समाज बांधवांसह शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गुरुनानक देव यांचे दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिंधी समाजाच्या सर्व बंधू-भगिनींनी परीश्रम घेतले.
