करमाळा प्रतिनिधी  

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सुनिल बापु सावंत, अॅड.राहुल भाऊ सावंत, संजय आण्णा सावंत व मंडाळाचे जेष्ठ युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख, उपाध्यक्षपदी जय बिडकर व शुभम कोंगे, सचिवपदी भैय्या सूर्यवंशी, सहसचिवपदी सागर नलवडे व खजिनदार पदी  भुषण सुरवसे, सहखजिनदार सागर वीर, मिरवणूक प्रमुखपदी राहुल बनकर, उपमिरवणुक प्रमुख बंटी शिंदे व कार्याध्यक्षपदी अवी सुरवसे यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व शेवटी संदीप दुधाळ यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *